Crime Maharashtra Solapur City

सोलापूरातील रेशन दुकानदारांच्या तक्रारी आहेत का? मग या अधिकाऱ्यांना कळवा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- कोरोनाच्या प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात टाळेबंदी असून या काळात गरजू, गरीब नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारने मे आणि जून 2021 या दोन महिन्याचे गहू आणि तांदूळ मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. मात्र रेशन दुकानदारांविरूद्ध नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत, तक्रार निवारणासाठी सोलापूर शहरात अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी दिली.
            शहरात परिमंडळ अधिकारी, अ, ब, क, ड विभागाच्या अधिनस्त 314 रास्त भाव धान्य दुकानात मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. धान्य वाटप करताना दुकानदार मंजुरीपेक्षा कमी धान्य देत आहेत, पावती देत नाहीत, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर गहू, तांदूळ पावती देऊन मोफत द्यायचे आहे. शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेतल्यानंतर दुकानदाराला पावतीची मागणी करावी. मंजूर धान्य न दिल्यास किंवा पावती न दिल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन श्री. समिंदर यांनी केले आहे.
अ विभाग (सुरेश गायकवाड-9923701818, नितीन शिंदे-8329259966, सोनाली निठुरे-9022008681),

ब विभाग (नितीन वाघ-9067229628, सुयोग देशमुख-8208901672, चंदनशिवे-9284589855),

क विभाग (अनिल गवळी-9822293052, अनिल शहापुरे-7620999268, इलियास भाईकट्टी-9834927686),

ड विभाग (सुरेश गायकवाड-9923701818, लक्ष्मण पवार-9665122071, मनीषा अंकुशे-8208828246)

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com