download 12
Environment

नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा : पर्यटन राज्यमंत्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नाशिक- नाशिक विभागातील पर्यटनस्थळांचा एमटीडीसीच्या माध्यमातून संपूर्ण विकास करून त्यात पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा आणि ती पर्यटनस्थळे लवकरात लवकर पर्यटकांच्या सेवेत आणावीत, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी  दिल्या आहेत. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, शिर्डी येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये पर्यटकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार माफक दरात सोयी, सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांचा पर्यटक अधिक प्रमाणात लाभ घेवू शकतील. तसेच नाशिक येथील गंगापूर कन्वेन्शन केंद्र, कलाग्राम केंद्र, यासोबतच नंदूरबार जिल्ह्यातील संगमेश्वर, केदारेश्वर मंदिर परिसर आदी पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून तेथील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामे पूर्ण करण्यात यावीत. विभागातील सर्व पर्यटन स्थळांचा विकास करत असतांना कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. कुठलेही काम अपूर्ण अवस्थेत ठेवू नये अथवा अंशत: पूर्ण करू नये, असेही  राज्यमंत्री आदिती  तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

              बैठकीनंतर राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी  ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी करून गंगापूर येथील बोट क्लब प्रकल्पास देखील भेट दिली. तसेच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बोटींगचे पहिले तिकीट काढून बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह नायर ह्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. आज नाशिक येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ग्रेप रिसॉर्ट येथे आढावा बैठकीत राज्यमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आषुतोष सलिल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे कार्यकारी अभियंता विनय वावधनी, स्थापत्य अभियंता महेश बागुल, विद्युत विभागाचे अभियंता सतीश चुडे, कनिष्ठ अभियंता रोहित अहिरे, कुलदिप संख्ये आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com