Economy

इनाम-धामणी येथील प्रलंबित पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  मिरज तालुक्यातील इनाम-धामणी येथील 24 तास पाणीपुरवठा योजनेस गती देऊन एका महिन्याच्या आत योजना पूर्णत्वास न्यावी. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या या योजनेस जबाबदार संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. विधानभवन येथे सांगली जिल्ह्यातील इनाम-धामणी येथील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी, मिरजचे उपविभागीय अधिकारी बी.एस.महाजन, विठ्ठल पाटील, आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष  पटोले म्हणाले, मागील अनेक वर्षे पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित आहे. अत्याधुनिक मीटर यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. योजनेचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. निधी उपलब्धतेनंतर योजना राबविण्यात गैरकारभार झाल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात यावी. प्रलंबित असलेली योजना एका महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश अध्यक्ष पटोले यांनी दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com