dpdc meeting 750x375 1
Economy Maharashtra

लोकप्रतिनिधींच्या प्रश्नावरील अनुपालन शंभर टक्के पूर्ण करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर-  जिल्हा नियोजन समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या अनुपालनाचा शंभर टक्के अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात यावा. तसेच यावर्षीच्या नियोजनातील प्रत्येक विभागाचा खर्च पूर्ण होईल, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी गंभीरतेने लक्ष घालण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. जिल्हा नियोजन समितीची सभा पुढील महिन्यात प्रस्तावित आहे. त्यामुळे गेल्या  बैठकीतील अनुपालन अहवाल, नवीन वर्षासाठीचे प्रस्ताव, जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण पुनर्विनियोजन, जिल्हा वार्षिक योजनेचे सर्वसाधारण प्रारुप, आराखडा 2021-22 संदर्भातील आढावा, घेण्यासाठी पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कार्यकारी समितीची सभा आज घेण्यात आली. या सभेत प्रत्येक विभागाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील 3 महिन्यात हा निधी खर्च करण्यासंदर्भात प्रत्येक विभागाला विचारणा करण्यात आली.

                   कोरोनामुळे गेल्या मार्चपासून अनेक कामे प्रभावित झाली आहे. त्यामुळे पुनर्विनियोजन करताना अल्प काळामध्ये हा निधी खर्च करण्याबाबत विभागनिहाय चर्चा यावेळी करण्यात आली. पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या सोबतच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर बैठकीस उपस्थित होते. यावेळी या अधिकाऱ्यांनी अनेक विभागाचा आढावा घेताना ताळमेळ न जमणाऱ्या खर्चाची रक्कम वेळेआधीच समर्पित करण्याच्या सूचना दिल्या. नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे यांनी प्रत्येक विभागाला आपल्या संभाव्य खर्चासाठी केलेल्या नियोजनाबाबत विचारणा केली. पुढील महिन्यात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तत्पूर्वी 20 जानेवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीतील कार्यपालन अहवालही यावेळी सादर करण्यात आला. पालकमंत्री डॉ. राऊत यांनी 100% अनुपालन अहवाल पूर्ण झाला पाहिजे. बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती दिली गेली पाहिजे असे निर्देशित केले.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com