Solapur City News 29
Entertainment

नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी नाट्यगृह भाड्यात सवलत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रात विपरीत परिणाम झाला आहे, याचा फटका सर्वच कलाप्रकारांना बसलेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या संस्थांवर अनेक लोक अवलंबून असतात. सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून ठाण्यातील नाट्यगृहांमध्ये सादर होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाच्या मुळ भाड्याच्या केवळ 25 टक्के भाडे आकारण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने यापुर्वीच घेतला असून नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी हा निर्णय लागू असल्याने प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी प्रशासनास दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा फटका नाट्यनिर्माते तसेच सांस्कृतिक कलाक्षेत्रातील मंडळांना बसला आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सुचनेनुसार महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी नाट्यगृहाच्या मुळ भाड्याच्या २५ टक्के भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा निर्णय हा केवळ नाटकांसाठी मर्यादित नसून मराठी वाद्यवृंद, लोककला आणि इतर सर्व प्रकारच्या सास्कृतिक कार्यक्रमांसाठी लागू असल्याने नाट्यगृह व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी करावी असेही महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143