Maharashtra

शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या पाठीशी प्रशासन; पालकमंत्र्यांच्या शोकसंवेदना

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर-  छत्तीसगडमधील कोहकामेटा परिसरात नक्षली विरोधी कारवाईदरम्यान भिवापूर येथील 40 वर्षीय जवान मंगेश हरिदास रामटेके हे शहीद झाले. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी शहीद जवानाच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शहीद जवान मंगेश हरिदास रामटेके हे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस  आयटीबीपी ) सेवेत होते. कोहकामेटा परिसरात  5 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटात ही दुर्घटना घडली. नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना त्यांना वीरमरण आले. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज जाहीर केलेल्या आपल्या शोकसंदेशात मंगेश रामटेके यांच्या कुटुंबियांसोबत शासन असल्याचे सांगितले. नक्षली विरोधात लढताना भिवापूरच्या या जवानाला वीरमरण आले असून त्यांच्या शौर्याची आणि समर्पणाची समाज कायम आठवण ठेवेल. रामटेके कुटुंबियांची ही कधीही भरून न निघणारी हानी असून या दुःखद क्षणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण रामटेके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143