Health Maharashtra

कोरोनामुळे काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची प्रकृती चिंतादायक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे-  सर्वसामान्यप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे.

हे वाचा- लोकमंगल बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त 51 जणांचे रक्तदान

                        काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.  मुंबईतील लीलावती रुग्णालयाची टीम पुण्यात उपचार करण्यासाठी पोहोचली आहे. परंतु, प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्यात यणार असल्याची माहिती मिळत आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

प्रभाग तिथे लसीकरण केंद्र सुरू करा; भारतीय जनता युवा मोर्चेच्या वतीने विविध मागण्या

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

 

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com