fbpx
Solapur City News 20 मोदी सरकारच्या सात वर्षांच्या अपयशी कारभाराचा सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने निषेध
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारला 30 मे 2021 रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या सात वर्षातील अपयशी कारभाराचा निषेध कॉंग्रेस भवन सोलापूर येथे करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की 2014 आणि 2019 ला अच्छे दिन आणि विकासाचे खोटे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या केंद्रातील मोदी सरकारचे सात वर्षे पूर्ण होत आहेत मोदी सरकारच्या या सात वर्षात जनतेच्या हिताचे एकही निर्णय घेतले नाही उलट या सात वर्षाच्या मोदी सरकारच्या अपयशी कार्यकाळात त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोनाच्या साथ रोगामध्ये नियोजनातील अपयश, दुसऱ्या लाटेस व लाखोंच्या मृत्युस कारणीभूत, दररोज पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ, वाढलेली प्रचंड महागाई, नोटबंदी जीएसटी सारखे चुकीचे निर्णय त्यामुळे कोटयावधी बेरोजगार, लाखो उदयोग बंद पड़ले, शेतकरीविरोधी काळे कायदे, देशाची संपत्ती असलेल्या सरकारी कंपन्या विकले, चुकीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नामुष्की, आपल्या उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, पेट्रोलियम कंपन्या, बँका, एलआईसी अश्या जनतेची संपत्ती असलेल्या सरकारी कंपन्या विकली, देशात लसीचा तुटवडा असताना पाकिस्तानला कोट्यावधी लस दिले. महाराष्ट्राला जाणीवपूर्वक ऑक्सीजन, रेमिडेसिविर इंजेक्शन, लसीचा कमी प्रमाणात पुरवठा, खताच्या दरात प्रचंड दरवाढ, रिझर्व बैंकेचा राखीव फंड गडफ़ करण्यात आला, संविधानिक संस्थांवर दबाव, देशावर कर्ज़ाचा प्रचंड बोजा वाढविला असून मोदी सरकार म्हणजे देशाला लागलेली साडेसाती आहे. या सरकारला लवकरात लवकर सत्तेवरून पायउतार करायला पाहिजे. आज आम्ही कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या सात वर्षाच्या अपयशी कारभाराचा निषेध करत आहे.
                          या निषेध आंदोलनात नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, परवीन इनामदार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर अलकांताई राठोड, नलिनीताई चंदेले, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी, सुमन जाधव, अनिल मस्के, पशुपती माशाळ, युवराज जाधव, राहुल वर्धा, हारून शेख, श्रीधर काटकर, सहदेव इप्पलपल्ली, अब्दुल रजाक कादरी, नागनाथ बंगाळे, प्रमिला तुपलवंडे, रतन डोळसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update