fbpx
124830885 1261116167586411 6450638604813950774 o
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- एनटीपीसी सोलापूर व्यवस्थापनाच्या प्रयत्नातून सिंगारेनी कोलरिज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) कडून कोळसा खरेदी केली जात आहे. त्यामुळे एनटीपीसी-सोलापूर प्रकल्प वीज निर्मितीचा दर खाली आणण्यात यशस्वी ठरला आहे. परिणामी, सोलापूर प्रकल्पातुन दोन्ही संयंत्राद्वारे पुर्न क्षमतेने वीज निर्मितीत उत्कृष्ट योगदान देत आहेत. त्याचबरोबर एनटीपीसी-सोलापूर प्रकल्पात 23 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प आणि एश डेक क्षेत्रामध्ये 40 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अशी माहिती एनटीपीसी-सोलापूर प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक एनटीपीसी-सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
                    नामदेव उप्पार म्हणाले, या व्यतिरिक्त एनटीपीसी-सोलापूर प्रकल्पात फ्ल्यू गॅस मधील एसओएक्सचे प्रमाण कमी करण्यासाठी एफजीडी यंत्रणेचे कामही प्रगतीपथावर असून मार्च-२०११ पर्यंत प्रथम युनिट कार्यान्वित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पर्यावरण आणि समुदायक विकासाविषयी बोलताना मुख्य महाव्यवस्थापक म्हणाले की एनटीपीसी-सोलापुरने परिसर हिरवा आणि स्वच्छ वातावरणासाठी सोलापूर जिल्ह्यात 3,,50,000 हून अधिक वृक्षारोपण, सामाजिक वनीकरणच्या माध्यमातुन केले आहे. कोरोना व्हायरस साथीच्या गंभीर काळात एनटीपीसी-सोलापुरातर्फे सातत्याने वीज निर्मिती केली जात होती आणि कोरोना दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात होती. महामारी दरम्यान, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि आस-पासच्या गावांमध्ये फेस मास्क, सेनेटिझर्स, हातमोजे आणि सोलापूर कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रे, होटगी यानां थर्मल स्कॅनर, मल्टी मॉनिटर्स आणि वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. गरजू व स्थानंतरीत कामगारांना धान्य वाटप केले आहे. यासह कोविड माहामारी निपट्ण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाला पाच लाखांची रक्कम देण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त गावांमध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम अंतर्गत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन शाळांमध्ये बसविण्यात आल्या आहेत, 150 हुन अधिक शौचालया, ओव्हर हेड टँक, जिल्हा परिषद शाळांच्या 70 वर्गांच्या डिजिटलाजेशन व अंगणवाडी बांधकाम इत्यादीसाठी 4..8 कोटी जिल्हा प्रशासना कडे जमा केले आहेत. सोलापूर शहराची पाणीटंचाई लक्षात घेता एनटीपीसीने उजनी ते सोलापूर शहरापर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी सोलापूर महानगर पालिकेला 250 कोटी रुपये देण्याच्या सामंजस्य करार केला आहे.
                      पत्रकार परिषद दरम्यान  नामदेव उप्पार, मुख्य महाव्यवस्थापक (सोलापूर) यांनी सांगितले की एनटीपीसी-सोलापूर प्रकप्ल एक सुपर क्रिटिकल प्रकल्प आहे. प्रकल्पात 660 मेगावॅटची दोन संयंत्र असून एकूण स्थापित क्षमता 1320 मेगावॅट आहे. या प्रकल्पातील वीज निर्मितीचे लाभार्थी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दमण आणि दीव, दादर आणि नगर हवेली ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. एनटीपीसी बद्दल बोलताना उप्पार म्हणाले एनटीपीसी ची आज एकूण स्थापित क्षमता 62,918 मेगावॅट आहे (ज्यात संयुक्त प्रकल्पांचा समावेश आहे) 24 कोळसा आधारित, 7 गॅस आधारित, 1 हायड्रो बेस्ड, 1 लघु जलविद्युत, 1 पवन आधारित, 12 सौर स्टेशन देशभरात आहे. संयुक्त उपक्रमात 9 कोळसा, 4 गॅस आणि 12 अक्षय ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. एनटीपीसीने 2032 पर्यंत 1,30 गिगावॉट स्थापित वीज क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
                       पत्रकार परिषदेला नामदेव उप्पार, मुख्य महाव्यवस्थापक (सोलापूर), के. व्यंकट्या, सरव्यवस्थापक (तांत्रिक सेवा), अनिल कुमार, सरव्यवस्थापक (प्रकल्प व एफजीडी), अनिल श्रीवास्तव, महाव्यवस्थापक (देखभाल) आणिदीपक. रंजन देहुरी, महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स) उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी माध्यम प्रतिनिधींनी सोलापूर प्लांटला भेट दिली व विज निर्मितीच्या तांत्रीक बाबींची माहीती घेतली. पत्रकार परिषदेत राष्ट्रीय व स्थानिक प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत एनटीपीसीच्या कामगिरी व सामुदायिक विकासाच्या कामांवर पीपीटी मीडिया प्रतिनिधींना सादर करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update