Job School & Collage

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे निर्देश

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले. मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठामध्ये विविध विभागांतर्गत तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाते. मात्र या कामगारांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन दिले जात नाही अशा अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. याची दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आढावा घेतला.

                         सामंत म्हणाले, विद्यापीठामध्ये कुशल, अर्धकुशल, अकुशल गटामध्ये तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी कर्मचारी आणि कामगार काम करीत असतात त्यांना कामगार कायद्यानुसार वर्गवारीनुसार किमान वेतन मिळाले पाहिजे. मात्र काही विद्यापीठांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाहीत अशा तक्रारी आहेत. विद्यापीठांनी कामगार कायद्यानुसार त्यांना किमान वेतन द्यावे, त्यामुळे कामगारांच्या सध्याच्या वेतनापेक्षा किमान ४ ते ५ हजारांनी वाढ होऊन त्यांच्या हक्काचे वेतन मिळेल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. बैठकीला कामगार विभागाचे आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके, बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु रामा शास्त्री, कुलसचिव डॉ.बी.एफ.जोगी, अधिष्ठाता डॉ. नलबलवार, सह सहयोगी अधिष्ठाता डॉ.जोशी आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com