Covid 19 Solapur City

सोलापूरात रिक्षाद्वारे कोरोना जनजागृतीला सुरुवात

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- शहरात दिवसेंदिवस कोरोना संख्या वाढत असताना “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” याअंतर्गत नागरिकांपर्यंत जनजागृतीला सुरूवात करण्यात आले. कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना म्हणून सोलापूरात रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात आले. आज अक्षयतृतीय व छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनजागृतीस सुरुवात करण्यात आले. याप्रसंगी संत महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेवक संजय कोळी, संजय कणके, सिद्राम बोराळे, बिपीन पाटील, संतोष म्हामाणे, उमेश काळे, महाळप्पा नवले यांच्या उपस्थितीत जनजागृतीला सुरुवात झाली. प्रभाग 3 मधिल घोंगडे वस्ती, भवानी पेठ, शाहीर वस्ती, मड्डी वस्ती या भागातील नागरीकांना जनजागृती करण्यात आले. संचारबंदी दरम्यान प्रत्येक नियमांचे पालन करा, कृपया घरातच राहा, कामाशिवाय बाहेर पडूच नका, गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जायचे टाळा, अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करा, आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ करा किंवा सॅनिटायझरचा वापर करा अश्या घोषणेने जनजागृती करण्यात आले.

हे वाचा –

मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे- आ. सुभाष देशमुख यांचे आवाहन

 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com