fbpx
Solapur City News 116 कोरोनामुळे पुण्यात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे- कोरोनामुळे आणखी एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. हडपसर परिसरात राहणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे हडपसर परिसरात शोककळा पसरली आहे. परंतु नागरिकांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कोरोनाविषयक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं असतानाही विनाकारण बाहेर पडत नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.
                   मृत पावलेल्या श्याम कुचेकर यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आईला जहांगीर हॉस्पिटलमध्ये, तर वडिलांना बाणेर येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये आणि भाऊ विजय हे शिवाजीनगर इथल्या जम्बो कोविड सेंटर उपचारांसाठी दाखल झाले होते. कोरोनासोबत लढा देताना 9 एप्रिल रोजी लक्ष्मण कुचेकर यांनी प्राण सोडले. त्यानंतर आई सुमन यांचा 16 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आई वडिलांच्या मृत्यूची माहिती श्याम यांना देण्यात आली नव्हती. मात्र श्याम यांची प्रकृती खालावली होती. सहा दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी दुपारी श्याम यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये  शोककळा पसरली होती. श्याम कुचेकर यांचा अंत्यविधी हडपसर गाव इथल्या विद्युतदहिणीत करत असतानाच बाणेर येथे उपचार घेत असलेल्या त्यांचा भाऊ विजय यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. अशाप्रकारे कोरोनाने एक अख्खं कुटुंबच हिरावलं आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update