Solapur City News
Covid 19

कोरोना वाढतोय ! शनिवार-रविवार गरज नसेल तर घराबाहेर पडू नका – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मी जबाबदार ‘, मोहीम महाराष्ट्रात सुरू केली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज नागपूरमध्ये सध्या आहे. रुग्ण संख्या सतत वाढत असून कोरोना शहरात वाढत आहे. त्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवावी. नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

पालकमंत्र्यांनी आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, , जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकर, मनपा उपायुक्त राम जोशी व कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका क्षेत्र व नागपूर ग्रामीण क्षेत्रांमधील आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा त्यांनी प्रामुख्याने आढावा घेतला. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये बेडची उपलब्धता, अतिदक्षता कक्ष, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता, रक्तसाठ्याची उपलब्धता, मनुष्यबळाची उपलब्धता, कन्टेनमेंट झोनची सद्य:स्थिती, नियंत्रण कक्ष, रिअल टाईम बेड उपलब्धता, कोविड मित्राची तैनाती, आरोग्य पथकाच्या ग्रुप भेटीत झालेली वाढ, चाचण्यांची संख्या, सुपर स्प्रेडरच्या किती चाचण्या सुरू झाल्या, शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी द्यावयाच्या सूचना, जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना, शनिवार-रविवार मार्केट बंद तयारी ठेवण्यासाठीच्या पूर्व तयारीसंदर्भातही आज सर्व विभागाकडून आढावा घेण्यात आला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com