Solapur City

कोरोना विलगीकरण केंद्रातील रुग्णांना दिला धीर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची अक्कलकोट कोव्हीड सेंटरला भेट 

सोलापूर- कोव्हीड केअर सेंटर वरील दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेत तेथे दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपचार तसेच याठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही विचारणा करीत खासदार डॉ. जयसिद्धेश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी विलगीकरण केंद्रातील सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
 
                     शुक्रवारी अक्कलकोट शासकीय निवासी शाळा येथील कोविड केअर सेंटर, अन्नछत्र कोव्हिड केअर सेंटर तसेच डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर (DCHC) येथे खासदार डॉ. जयसिद्धेश्र्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी भेट देऊन कोरोना बाधीत रुग्णांची विचारपूस केली. आहार, विहार उत्तम ठेवल्यास कोरोना या आजारांवर कशापध्दतीने मात करावी याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन करुन रुग्णांना धीर दिला.

हे वाचा – सोलापूरात रिक्षाद्वारे कोरोना जनजागृतीला सुरुवात

यावेळी कोरोना रुग्णांशी हितगुज करीत त्यांच्या उत्तम स्वास्थ्याची कामना केली. कोरोना बाधित रुग्णांनी मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवल्यास आपण पूर्णपणे सुरक्षित राहू असे खासदार डॉ. जयसिद्धेश्र्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी उपस्थित रुग्णांना सांगितले. तसेच कोव्हीड योद्धे असलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांनी देखील सतर्कपणे सेवा द्यावी. त्यांच्या हि समस्या जाणून घेत रुग्णांची देखभाल योग्य प्रकारे होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त करीत त्यांचे आभार मानले. विशेषतः स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचेही आभार मानले. याप्रसंगी सेंटर वर डॉकटर, परिचारिका इतर कर्मचारी वृंद उपस्थित होता.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com