corona-obstruction-under-phule
Health Solapur City

Ayushyaman Bharat Yojana : सोलापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना बाधित व इतर आजारांच्या रुग्णांनी घेतला लाभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर Ayushyaman Bharat Yojana- गोरगरीब व आर्थिक दुर्बल रुग्णांना आजारपणात  उपचारासाठी  मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार सेवा मिळावी तसेच  रुग्णांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य शासन महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना राबवित आहे.  सोलापूर  जिल्ह्यात 1 एप्रिल 2020 पासून  7 हजार 78 कोरोना बाधित तर 50 हजार दोन  विविध आजार अशा एकूण 57 हजार 80 रुग्णांनी  या योजनतून लाभ घेतला आहे. 

             महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सोलापूरसह तालुक्यातील कोरोना बाधित तसेच विविध प्रकारच्या उपचारासाठी  रुग्णांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातून 1 एप्रिल 2020 पासून      7 हजार 78 कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी  19 कोटी 56 लाख  16 हजार 750 रुपये मंजूर करण्यात आले  असून , यापैकी 10 कोटी 64 लाख 10 हजार 490 रुपये संबधित रुग्णालयांना शासनाकडून देण्यात आले आहेत.  तर  विविध  आजारांच्या  50 हजार 02 रुग्णांच्या  उपचारासाठी 80 कोटी  15 लाख 53 हजार 339 मंजूर करण्यात आले आहेत. तसेच या योजनेतंर्गत म्युकर मायकोसिससाठी 19 प्रकारच्या उपचारांचा समावेश असून यामध्ये 11 सर्जिकल व 8 औषध उपचारासाठी समावेश करण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत म्युकर मायकोसिसच्या Mucor mycosis रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकडून औषधांचा मोफत पुरवठा करण्यात  येत आहे. या रुग्णांसाठी  1 लाख 50 हजार  रुपयांपर्यंतचा खर्च विमा कंपनी देणार असून, त्यावरील होणार सर्व खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटी देणार आहे.  सोलापूर शहर व जिल्ह्यातील 45 रुग्णालयांचा महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 6 शासकीय व खाजगी 39 रुग्णालयांचा समावेश आहे.  सध्या 45 रुग्णालयांपैकी 23 रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार देण्यात येतात.  यामध्ये5 रुग्णांलयात म्युकर मायकोसिस आजारासाठी उपचार केले जातात. तसेच 22 रुग्णालयांमध्ये इतर आजारांवर रुग्णांवर उपचार केले जातात.

म्हणून सोलापूर ग्रामीण हद्दीत कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

        महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेमध्ये Ayushyaman Bharat Yojana एकूण  1 हजार 209 विविध आजरावर उपचार केले जातात. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये प्रतिवर्षी  1 लाख 50 हजार तर  आयुष्यमान भारत योजनेमध्ये 5 लाख रुपये पर्यंत रुग्णांना लाभ देण्यात येतो. असे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.दिपक वाघमारे यांनी सांगितले

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews