Solapur City News 118
Maharashtra Suicide / Murder

राज्यात आगीचा तांडव सुरूच; वसई विरारमध्ये कोरोना सेंटरमध्ये 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

वसई विरार- पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एका कोरोना सेंटरला आग लागल्याने 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या कोरोना कंट्रोल रूमने याची पुष्टी लेली आहे. इतर रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे. आगीची ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजताच घडली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षा विभागाला रात्री 3 च्या सुमारास ही आग लागली. या भीषण आगीमध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात यावेळी 17 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com