Covid 19

सुखद बातमी! पुण्यात कोरोनाची लाट ओसरली

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या पुणे जिल्ह्यातील परिस्थिती आता बदलताना दिसत आहे. याठिकाणी कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट दुपटीने कमी झाला आहे. 3 मे रोजी पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट 21 टक्के होता, 17 मे रोजीच्या आकडेवारीनुसार तो 9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही (रिकव्हरी रेट) 90 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. सध्याच्या घडीला पुण्यात 18,440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com