Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे, सोलापूर महानगरपालिका जोडभावी पेठ नागरी आरोग्य केंद्र, सोलापूर आणि मोकाशी हॉस्पिटल प्रभाग क्र. ३ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शनिवारी सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम महाराष्ट्र राज्याच्या “मिशन युवा स्वास्थ्य” योजने अंतर्गत राबविण्यात आले. शिबिराचे उदघाटन सिद्धेश्वर महाराज व कर्मयोगी स्व.अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी.ए. चव्हाण यांनी उपस्थित नगरसेवक सुरेश पाटील, डॉ. एस. बी .अलकुंटे, आरोग्य अधिकारी, जोडभावी पेठ, नागरी आरोग्य केंद्र, सोलापूर यांचे स्वागत व सत्कार केला. डॉ. ज्योती साळवे व आरोग्य विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. टी.ए. चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या विद्यार्थ्यांचे दोन लस पूर्ण झाले असतील त्यांनाच ऑफलाइन क्लासेसला हजर राहता येणार आहे. त्याकरिता सर्व विद्यार्थिनींनी लसीकरण करून घ्यावे असे त्यांनी आवाहन केले. यानंतर डॉ. अलकुंटे बोलताना म्हणाले, लसीकरण करून घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून लसीकरणामुळेच आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. नगरसेवक सुरेश पाटील यांनी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींबरोबरच त्यांच्या मित्र मैत्रिणी व नातेवाईक यांनीही या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या आवाहनानुसार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी पहिला डोस – २८ दुसरा डोस – २३ असे एकूण ५१ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. प्रा. अश्विनी निंबाणे, प्रा. विनय शिरश्याड, प्रा. रविकांत पाटील यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. या शिबिराच्या समन्वयक डॉ. योगिता दातार यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा भरगंडे यांनी केले. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डावीकडून सौ. अन्नपूर्णा धुळम, सौ. सुजाता तुरूप, कैलास करपे, प्रा. अश्विनी निंबाणे, डॉ. एस. बी .अलकुंटे, डॉ. टी.ए. चव्हाण, प्रा. संजीव जमगे, डॉ. ज्योती साळवे, डॉ. ए.एस.पाटील, कु. विहारा कसबे, सौ. मंजेली, सुरेश पाटील, अक्षय पाटील, डॉ. योगिता दातार
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143