Covid 19 Maharashtra

जेष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मार्गदर्शन व सहाय्य सेवा मदत केंद्र

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

किरण नाकती यांच्या आदित्य प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
ठाणे –  आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांच्या पुढाकाराने ” वुई आर फॉर यु” या अभियान अंतर्गत कोरोना लसीकरण मार्गदर्शन व सहाय्य सेवा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. “घेऊया लसीची साथ करूया कोरोनावर मात” या शिर्षका अंतर्गत जेष्ठ नागरिकांना लसीकरणा संबंधित कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन तसेच लसीकरण घेण्यासाठी नौपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरापासून ते लसीकरण केंद्रापपर्यंत तसेच लसीकरण केंद्र ते घरापर्यंत मोफत रिक्षा सेवा या मदत केंद्राच्या माध्यमातून आदित्य प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. यासाठी जेष्ठ नागरिकांनी जिंजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे येथील आदित्य प्रतिष्ठानच्या कार्यालयाशी किंवा 9004782919/8291087192 या क्रमांकावर केवळ एक कॉल करावा असे आव्हान अदित्य प्रतिष्ठान, ठाणे अध्यक्ष किरण नाकती यांनी केले आहे .कार्यालयात येणार जेष्ठ नागरिकांची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी रिक्षाने लसीकरणासाठी नेहण्यात येणार असून त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे.आदित्य प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे जेष्ठ नागरिकांनी कौतुक केले आहे. कोरोनाच्या काळात देखील ” वुई आर फॉर यु” या अभियान अंतर्गत किरण नाकती यांनी जेष्ठ नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच दिल्या.कोरोनाकाळात रक्ताची कमतरता भासत असताना रक्त उपलब्ध करून दिले तसेच कोरोना बाधित रुग्णांना मार्गदर्शन तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत काम आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले.आणि जाऊनही हे कार्य सुरू आहे. आता जेष्ठ नागरिकांना लस देखील सुलभ रित्या उपलब्ध व्हावी यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी किरण नाकती यांचे आभार मानले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143