coronas-new-symptoms-reappeared
Health Maharashtra

पुन्हा आली करोनाची नवी लक्षणे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

कोलकाता –  पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या लक्षणांमध्ये सध्या आणखी बदल झाले आहेत तसेच या साथीची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी झाली असल्याचे निरीक्षण कोलकातातील डॉक्टरांनी नोंदविले आहे. सध्या देशात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची लक्षणीय संख्या आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना जो भयानक त्रास झाला तसे चित्र सध्या नाही. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांची नोंदणी होताना दिसत नाही. आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला काही रुग्ण पाळत नाहीत. गेल्या महिन्यात कोरोना संसर्गाची लक्षणे बदलली असून ती फारशी तीव्र नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले.

हे वाचा – भिवंड़ित दुर्दैवी घटना ; मेट्रोचे काम सुरु असताना सळईचा सांगाडा कोसळला

          कोलकातातील डॉक्टरांना आढळले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना काही दिवस वास येत नसे, त्यांच्या तोंडाला चव कळत नव्हती. १० ते १५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रास व्हायचा, एकूण रुग्णांपैकी १० टक्के जणांना रुग्णालयात दाखल करावे लागायचे. सध्या कोरोना संसर्ग झाल्यावर सात-आठ दिवसांनी वास येईनासा होतो. चव कळत नाही. कफ होतो व अगदी कमी प्रमाणात ताप येतो. फारसा अशक्तपणा येत नाही. फक्त १ टक्क्यांहून कमी लोकांना श्वसनाचा त्रास होतो व रुग्णालयात दाखल करावे लागते. डाॅक्टरांनी सांगितले की. नागरिकांना बुस्टर डोस कधी देणार याची अद्याप कोणालाच कल्पना नाही. अनेकांनी दुसरा डोस घेऊन आता सहा महिने उलटले आहेत. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी काही उपाययोजना अंमलात आली पाहिजे.

२४ तासांत केरळात ४७१ रुग्णांचा मृत्यू

मागील २४ तासांत देशात ५५५ जणांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक ४७१ मृत्यू केरळातील, तर ४१ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. मृतांची एकूण संख्या आता ४,६३,२४५ झाली, तसेच कोरोनाचा मृत्युदर १.३५ टक्के झाला आहे. शनिवारी कोरोनाचे ११,८५० नवे रुग्ण सापडले. त्याबरोबर बाधितांची एकूण संख्या ३,४४,२६,०३६ झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घसरून १,३६,३०८ झाली असून हा २७४ दिवसांचा नीचांक आहे. शनिवारी सकाळी दैनंदिन बाधितांची संख्या सलग ३६व्या दिवशी २० हजारांच्या खाली, तर सलग १३९व्या दिवशी ५० हजारांच्या खाली राहिली.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews