Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Carporation: बाळीवेस येथील महापालिकेअंतर्गत असलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये महापालिकेला दोन मजले ताब्यात मिळणार आहेत. त्याठिकाणी महापालिका प्रसूतीगृह आणि खाजगी हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या इमारतीतील तिसरा व चौथा मजला महापालिकेच्या carporation ताब्यात मिळणार आहे. तिसऱ्या मजल्यावर महापालिकेचे प्रसुती गृह सुरू पूर्ववत करण्यात येईल तर चौथ्या मजल्यावर खाजगी हॉस्पिटलसाठी जागा लिलावाद्वारे महापालिका भाड्याने देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या ताब्यात येणारा तिसरा मजला हा 295 चौरस मीटर क्षेत्रफळ तर चौथ्या मजल्याचे 731 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे बरीच वर्ष रखडलेला हा प्रकल्प अखेर मार्गी लागला. येत्या दीड महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणार असून या ठिकाणी महापालिकेचे प्रसूती गृह तसेच खाजगी हॉस्पिटल सुविधा नागरिकांना मिळू शकणार आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143