fbpx
country is self-sufficient in oxygen
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील प्रकल्पाचे लोकार्पण

पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजारहून अधिक प्राणवायू निर्मिती प्रकल्प

अमरावती-  कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. पीएम केअर फंडातर्फे उभारण्यात आलेल्या देशभरातील 35 ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. त्याचा मुख्य सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्पाचाही त्यात समावेश असून, यानिमित्ताने स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा,आमदार प्रताप अडसड, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते.

हे वाचा- सोलापूरच्या व्यापार विश्वाला खुले होते नवे दालन; सोलापूर सोशल फाउंडेशन च्या प्रयत्नांना आलेले यश

         कोरोना संकटकाळातील अडचणींवर अथक प्रयत्नांतून केलेली मात, विविध सुविधांची वेगाने निर्मिती आदी बाबींवर प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. ते म्हणाले की, कोरोना संकटकाळात देशाने अत्यंत थोड्या काळात गतीने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उभारल्या. रूग्णालये, प्रयोगशाळा, ऑक्सिजन निर्मिती, लसीकरण मोहिम अशा कितीतरी गोष्टींना चालना देण्यात आली. अत्यंत थोड्या काळात देशाने उभारलेले हे कार्य समस्त भारतीयांच्या बंधुभाव व एकतेचे प्रतिक आहे. वैद्यकीय प्राणवायूची गरज लक्षात घेऊन उत्पादनात दसपट वाढ कऱण्यात आली. भौगोलिक वैविध्य पाहता देशाच्या कानाकोप-यात ऑक्सिजनची वेगवान वाहतूक हे आव्हान होते. मात्र, भारताने ते यशस्वीरित्या करून दाखवले. वायूसेना व डीआरडीओने त्यासाठी योगदान दिले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे मोठे नेटवर्क देशभर उभे राहिले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध         

           अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनची मागणी 23 मे. टन पर्यंत पोहोचली होती. हे लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचे उत्पादन तिप्पट वाढविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आजमितीला प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. पीएम केअर फंडातून ‘एल अँड टी’ आणि ‘डीआरडीओ’ यांच्या सहयोगातून हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात  17 पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे  नियोजन असून, त्यातील 3 प्रकल्प पीएम केअर फंडातून उभारण्यात येत आहे. त्यात अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्प  1 हजार एलपीएम क्षमतेचा आहे. दुसरा प्रकल्प मोझरी येथील आयुर्वेद रुग्णालय येथे असून, त्याची क्षमता 1 हजार एलपीएम आहे. तिसरा प्लांट दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात असून त्याची क्षमता 200 एलपीएम आहे. कार्यक्रमानंतर खासदार तडस, खासदार श्रीमती राणा, आमदार तडस, जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी प्रकल्पाची पाहणी केली व वैद्यकीय अधिकारी, तसेच तंत्रज्ञांशी चर्चा केली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update