fbpx
Court grants bail Neelu Rathore

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर Court  – पुन्नू धेनु चव्हाण याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला नीलू राठोड,वय: 58 रा:अचलेर,ता.अक्कलकोट,जि:-सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन आर बोरकर यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की, दि:-11/4/2021 रोजी रात्री 10:00 चे सुमारास नीलू राठोड व इतर आरोपीतांनी बेकायदेशीर जमाव जमवून “सोमलाबाई चव्हाण हिस तू वाळू कोठून आणलीस,तू माझ्या विरोधात ग्रामपंचायतीस का उभी राहीलीस” या कारणांवरून सोमलाबाई चव्हाण,पुन्नू चव्हाण,पिंटू चव्हाण यांना काठीने व दगडाने मारहाण केली होती.

                 Court  तद्नंतर दि:-28/4/2021 रोजी पुन्नू चव्हाण याच्या पोटात व छातीत दुखू लागल्याने त्यास सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असता तो मयत झाला त्यावरून पोलिसांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपीतांना अटक केली होती.

120 अश्वशक्तीवरील 6 सिलेंडर क्षमतेच्या नौकांनाही मिळणार करमुक्त डिझेल कोटा

                Court  त्यावर नीलू राठोड यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. Court  त्यावर नीलू राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयात एडवोकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. Court  अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात घटनेनंतर जवळपास 17 दिवसानंतर पुन्नू हा मयत झाला आहे,तसेच गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आलेला आहे असे मुद्दे मांडले,त्यावरून न्यायाधीशांनी आरोपीस 25000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.      
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update