fbpx
covid-19-vaccines-children-three-years

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मुंबई Covid 19-  कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. अशातच भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीमध्येही बदल करण्यात आले आहेत. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पात्र लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 18 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस मिळत आहे. तर आता तीन महिन्याच्या पुढील मुलांनाही कोरोना लसमिळणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ (CEO) अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी दिली आहे.

सचिन वाझे प्रकरणात मुळाशी गेले तर फटाके फुटतील; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

        Covid 19 ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आलेल्या सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये  बोलताना अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे. पुढील सहा महिन्यात तीन वर्षाच्या वरील मुलांसाठी कोरोना लस Covid 19 विकसीत केली जाईल. असे पुनावाला यांनी सांगितले. शिवाय उपलब्ध डेटाच्या आधारे हे सांगणे सुरक्षित राहिल की, बूस्टर लसीचे डोस अँटीबॉडीज मिळविण्यासाठी चांगले धोरण आहे, असेही पुनावाला यावेळी म्हणाले.

                कोरोना महामारीच्या आजाराशी संपूर्ण देश दोन हात करत असताना आता लहान मुलांनाही कोरोना लस उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या आधी मागच्या महिन्यात भारतातील औषध नियामक प्राधिकरणाने 12 वर्ष व त्यावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी ‘जाइकोव्ह-डी’ लशीला मंजुरी दिली आहे. वय वर्ष 12 व त्यावरील व्यक्तीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली ही पहिलीच लस Covid 19 आहे. केंद्र सरकारने ‘जाइकोव्ह-डी’ लशीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एका डोसची किंमत कराशिवाय 358 रुपये आहे. या किंमतीत 93 रुपयाच्या ‘जेट एप्लीकेटर’च्या खर्चाचा समावेश आहे. त्याच्या मदतीने लशीचा डोस देण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे ही लस सुरुवातीच्या टप्प्यात फक्त वयस्करांना देण्याची शक्यता आहे. ‘जाइकोव्ह-डी’ लशीचे एक कोटी डोस दरमहा उपलब्ध होतील अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरकारला दिली.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update