Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर/कोंडी- ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार रुग्ण सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने कोंडी आरोग्य केंद्र येथे साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी नागरी आरोग्य केंद्र येथे अत्याधुनिक कोव्हीड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कोंडी गावचे सरपंच सुरेश राठोड, उपसरपंच किसन भोसले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील कुलकर्णी,डॉ सुनील पत्की, वैद्यकीय अधिकारी संदीप बापट, आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयात आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव, तसेच कोंडी नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी, व आशा वर्कर्स यांचा यथोचित सत्कार करण्यात आले.
हे वाचा– मनसुख हिरेन केसचा तपास; स्फोटके पुरवणाऱ्या दोन लोकांना NIA ने केली अटक
ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी कोरोना मारीच्या काळात अनेक लोकांना ऑक्सीजन बेड उपलब्ध न झाल्याने प्राणास मुकावे लागले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या गावातच दर्जेदार व उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण स्थानिक आमदार विकास निधीतून 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून अत्याधुनिक अशा मशिनरी व ऑक्सिजन बीडचे सोय या ठिकाणी करून देण्यात आली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा मिळेल आमदार स्थानिक विकास निधीतून दिलेल्या साहित्याची निगा चांगल्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी राखावी असं आवाहन यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकमार जाधव यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्याचं कौतुक केलं आमदार देशमुख आरोग्य मंत्री असताना त्यांनी केलेल्या कार्याला दुजोरा देत नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य लाभण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितले. कोंडी गावचे प्रतिष्ठित नागरिक संजय पवार यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोंडी गावासाठी केलेल्या विकास कामांची माहिती दिले. यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते कोंडी नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शिवाजी निळ, राजेंद्र भोसले, प्रसाद नीळ, लक्ष्मण साबळे, तुकाराम भोसले, मनोज निंबाळकर, भरत पाटील, ज्ञानेश्वर वाघमारे, ग्रामसेवक मारुती कांबळे, अंकुश भोसले, बालाजी भोसले, दिलीप राऊत, शंकर राठोड, सुदर्शन माळी, दत्ता भोसले, नामदेव सुतार, ओंकार सुतार, यांच्यासह कोंडी गावातील ग्रामस्थ व जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पवार यांनी केले तर आभार ग्रामसेवक मारुती कांबळे यांनी मानले.
#solapurcitynews