Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकल महाविद्यालयात covid-19 लसीकरण मोहीमाचे आयोजन
लसीकरण केंद्रास भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली भेट
सोलापूर- उच्य व तंत्र शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकल महाविद्यालय येथे विद्यार्थिनींचे कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील, आप्पासाहेब बाळू पाटील माजी नगरसेवक, सुरेश बिद्री, प्राचार्य गजानन धरणे, प्राध्यापक अतुल कंदले, डॉ सचिन अलकुंटे, किरण गलगली आदींची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घेणे हे फायदेशीर आहे नियमित मास्कचा वापर सोशल डिस्टंसिंग शानिटायझेशन करावे असे आव्हान या वेळी प्राचार्य गजानन धरणे यांनी केले.कोरोना महामारी ला हद्दपार करण्यासाठी जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले.
याप्रसंगी एकूण 69 जणांनी लसीकरण मोहिमेत सहभागी झाले असून विद्यार्थ्यांसह भागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी कैलास करपे, राजेंद्र आयवळे, अक्षय पाटील, ANM मंजेली सिस्टर, GNM आकाश जगताप, आशा वर्कर सुजाता तुरुप, आशा वर्कर अन्नपूर्णा धुळम यांनी काम पाहिले.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143