Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
नॅशनल Covishield – ऑक्सफोर्ड विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आलं आहे की अॅस्ट्राझेनेका लसीचा बूस्टर डोस घेतलेल्यांमध्ये ओमायक्रॉनविरूद्ध लढा देणाऱ्या अँटीबॉडी वेगाने वाढत आहेत. साध्या शब्दात सांगायचे झाल्यास बूस्टर डोस घेतलेल्यांना ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता ही अत्यल्प आहे. हिंदुस्थानसाठी ही बातमी विशेषार्थाने आनंदाची आहे, कारण आपल्या देशात 90 टक्के लोकांना अॅस्ट्राझेनेकाचीत लस देण्यात आली आहे. अॅस्ट्राझेनेका आणि सीरम इन्स्टीट्यूटने बनविलेल्या लसीचे नाव आहे कोविशील्ड असं आहे. अॅस्ट्राझेनेकाने गुरुवारी जाहीर केलं आहे की बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉनपासून तगडं संरक्षण कवच मिळतंय.
TET परीक्षेचा निकाल बनावट वेबसाइट तयार करून उमेदवारांची फसवणूक
Covishield ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी अॅस्ट्राझेनेकाचा बूस्टर डोस घेतलेल्या 41 जणांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले होते. या नमुन्यांची तुलना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांशी करण्यात आली. या तुलनेतून असं दिसून आलं की कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोविशील्डचा तिसरा डोस घेतलेल्यांच्या शरीरात ओमायक्रॉनविरोधी अँटीबॉडींचे प्रमाण हे खूप जास्त होतं. या निष्कर्षानंतर संशोधकांनी आवाहन केलं आहे की बूस्टर डोस देणं गरजेचं आहे. हिंदुस्थानात अद्याप बूस्टर डोस देण्याची सुरूवात झालेली नाहीये. 80 देशांमध्ये Covishield बूस्टर डोस देण्याची सुरुवात झाली आहे.
60 वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लसीचा चौथा डोस, इस्रायल ठरले जगातील पहिले राष्ट्र
60 वर्षांवरील सगळ्या नागरिकांना कोरोनावरील लसीचा चौथा डोस द्यायचं ठरवणारे इस्रायल हे पहिले राष्ट्र ठरले आहे. ओमायक्रॉनमुळे कोरोनाची आणखी एक लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत असून कोरोनाच्या या नव्या रुपाने युरोपातील काही देशात रौद्ररुप दाखवायला सुरुवात केली आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायलने हा निर्णय घेतला आहे. ओमायक्रॉनमुळे इस्रायलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यानंतर तिथलं प्रशासन सावध झालं आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने वयोवृद्धांना लसीचा चौथा डोस देण्यात यावा अशी शिफारस केली होती. या शिफारसीचे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी स्वागत केले आहे. जगभरात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी याचा फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ही शिफारस आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याम मान्य केली नाहीये. असं असलं तरी पंतप्रधानांनी या शिफारसीचे स्वागत केल्याने ती लवकरच मान्य होऊन प्रत्यक्षात चौथा डोस द्यायला सुरुवात होईल असे सांगितले जात आहे.
तिसरी लाट आली तर ओमायक्रोनचीच असेल!
हिंदुस्थानात कोरोना संसर्गाचा धोका हळूहळू कमी होत आहे, मात्र ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 54 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रोनचीच असेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. राज्यात आठ कोटी नागरिकांचा कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाल असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट धोकायदायक नाही. यात हॉस्पिटलाइज होण्याचे प्रमाण कमी असले तरी तो खूप संसर्गजन्य आहे. त्यामुळे नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
राज्यात ओमायक्रोनचा धोका वाढू नये यासाठी आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रोटोकॉलनुसार दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची तपासणी केली जात आहे. आम्ही या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. हायरिस्क कंट्रीजमधून येणाऱ्या विमानांमधील प्रवाशांची आरटीपीसीआर केली जात आहे. स्क्रिनिंग केले जात आहे आणि त्यामध्ये जर ते पॉझिटिव्ह आढळले तर पुढील जिनोमिंग सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात असल्याचे टोपे म्हणाले.
कोरोना मृत्यू लपवले नाहीत
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी महाराष्ट्र सरकारने लपवलेली नाही. अनेकवेळा डिस्चार्ज झाल्यानंतर वेगळ्या कारणाने मृत्यू झाल्यामुळे त्याची नोंद कोरोना मृत्यूमध्ये होत नाही. स्वॅब न घेता केवळ सिटी स्कॅन रिपोर्वकरून पॉझिटिव्ह ठरवलेल्या रुग्णांची संख्या पोर्टलवर अपलोड झालेली नाही. त्यामुळे आकडेवारीमध्ये फरक दिसत असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews