Covishield vaccinated?
Maharashtra

Covishield : कोविशील्ड लस घेतली का ?, ‘त्या’ अहवालानं वाढवली भारतीयांची चिंता

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

नवी दिल्ली Covishield  – जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत आहे. देशात ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यात कोविशील्ड (Covishield) लस घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. ओमिक्रॉनची दहशत पाहाता ब्रिटनच्या सरकारने बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू केली आहे. ब्रिटनमध्ये देण्यात येणारी ऍस्ट्राझेनेका (AstraZeneka) लस काही महिन्यांनी ओमिक्रॉन विरोधात निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे.

हे वाचा – पेपरफुटी प्रकरण; प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई निलंबित

        Covishield  भारतात मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली सीरम इन्स्टिट्युटची (Serum Institute) कोवीशील्ड लस ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोविशील्ड घेतलेल्या कोट्यवधी नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, ऍस्ट्राझेनेका निष्प्रभ ठरत असली तर या लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) मात्र ओमिक्रॉनविरोधात 76 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटनने बुस्टर डोसबद्दल निर्णय घेतला असला तरी भारतात याबद्दल अजून काही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे भारतात कोविशील्डच्या Covishield बुस्टर डोसचा काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलं आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews