Economy Maharashtra

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती- ग्रामविकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वदूर रस्त्यांचे जाळे उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज  केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सुमारे ११ कोटी निधीतूनजिल्ह्यातील विविध ग्रामीण रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी चांगापूर व विविध ठिकाणी झालेल्या भूमिपूजन  समारंभाला खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके, जि. प. सभापती संगीता तायडे,  माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरात अनेक रस्त्यांची निर्मिती होऊन गावे एकमेकांशी जोडली जातील. दळणवळण वाढून व्यवहाराला गती येईल व स्थानिकांचे जीवनमान उंचावेल.

अनेक गावांना जोडणारे रस्ते

केकतपूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत एस. एच 308 ते माळेगाव-केकतपूर (एल-04) रस्ता, ब्राम्हणवाडा भगत येथे अंतोरा ते ब्राम्हणवाडा रस्त्याचे भुमिपूजन,  चांगापूर येथे एम. एस. एच 14 ते चांगापूर रस्ता, निमखेड येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत एस. एच 14 ते निमखेड (एल-04) रस्ता,   निंदोडी येथे  एस. एच 47 ते उदापूर-निंदोडी (एल-14) रस्ता, वासेवाडी एस. एच 280 ते वासेवाडी (एल-06) रस्ता आदी ११ कोटींहून अधिक रकमेच्या कामांचे भूमिपूजन  पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले.

चांगापूर तीर्थक्षेत्र विकास

चांगापूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अधिकाधिक विकासकामे राबविण्यात येतील. पौराणिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी प्राधान्याने अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. ब वर्ग क्षेत्र समावेश व इतर अपेक्षित कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

केकतपुरला पाणीपुरवठा योजना व व्यायामशाळेचे उद्घाटन

केकतपूर येथे रस्त्याच्या शुभारंभाबरोबर नळ पाणीपुरवठा योजनेचाही शुभारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फ़े सुमारे २४ लक्ष निधीतून ही योजना साकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, केकतपूर येथील व्यायामशाळेचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com