Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित
सोलापूर Cricket – तालुका उत्तर सोलापुरातील कवठे येथे दिपावलीनिमित्त ‘कवठे प्रिमियर लिग-२’या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली. यामध्ये बंजारा टायगरचा थोरला वाडावर थरारक विजयी झाला आहे. या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग होता. त्यात बुधवारी बंजारा टायगरचे सामने रोमांचक झाला आहे.
Cricket स्पर्धेचे यंदाचे दुसरे कवठे प्रिमियर लिग होते. एकूण 8 संघांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामना बंजारा टायगर विरूद्ध थोरला वाडा यांच्यात झाला. Cricket प्रथम फलंदाजी करताना बंजारा टायगर संघाने निर्धारित सात षटकात 4 बाद 88 धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेला थोरला वाडा संघ सात षटकात 2 बाद 63 धावांवर आटोपला. बंजारा टायगर संघाने हा सामना 25 धावांनी जिंकत 11 हजार 101 रुपये व चषक असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. बंजारा टायगरचे कप्तान विकास राठोड यांनी 4 षटकार, 3 चौकार मारून 22 चेंडूत 49 धावा करून हा सामनावीर ठरला.
उपविजेत्या थोरला वाडा संघास 7 हजार 101 रुपये व चषक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांकाचे 5 हजार 101 रुपये व चषक हे बक्षीस ए.बी.नाईट रायडर्स संघाने पटकाविले. विकास राठोड (बंजारा टायगर) हा उत्कृष्ट फलंदाज तर, सुरज राठोड (थोरला वाडा) हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला. प्रथम पारितोषिक संजयकुमार काळे यांनी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक लक्ष्मण केंगार यांनी, तृतीय पारितोषिक बळवंत भोसले दिले होते. स्पर्धेसाठी अंबादास जगताप, भीमा पवार, याकुब शेख,अमीत पवार, गंगाधर कांबळे (ग्रामसेवक) आणि डॉ. सुखदेव कोकरे, निलकंठ रजपूत, विनोद चव्हाण,लक्ष्मण लवटे, राजू जाधव, बिरु सलगर, याकूब शेख, रणजित भोसले, सागर भोसले, शिवाजी राठोड, अजित पवार, मुकेश राठोड, अनिकेत केंगार, शहाजान शेख, राजू जाधव, इक्बाल शेख, करण राठोड, भिल्लू राठोड, दादा सलगर, नितीन जगताप यांच्यासह कवठे प्रिमियर लीग क्रिकेट क्लब चे सर्व खेळाडू व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143