fbpx
crime-application-rejected-case

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Crime – बनावट मृत्युपत्र तयार करून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी 1.सिद्धेश्वर उर्फ राकेश राजशेखर बागदुरे,2.दिपक राजेंद्र माशाळ,3.जगदीश सुधाकर जाधव रा.सोलापूर यांचा जामीन अर्ज मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग -1 भंडारी सो यांनी फेटाळला.

वळसंग पोलिसांची दमदार कामगिरी ! काही तासातच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; पैशांसाठी केले होते किडनॅप

              Crime यात हकीकत अशी की, फिर्यादीचे मयत वडील महादेव बागदुरे यांचे नावे बनावट मृत्युपत्र तयार करून त्याद्वारे उमासा नागरी सहकारी पतसंस्था शाखा रविवार पेठ सोलापूर येथील बचत खाते वरील दोन कोटी दहा लाख 68 हजार इतकी रक्कम बँकेचे तत्कालीन मॅनेजर व चेअरमन यांच्याशी संगनमत करून आरोपी राकेश उर्फ सिद्धेश्वर राज शेखर बागदुरे, राजशेखर बागदुरे, राजश्री बागदुरे, शारदा बागदुरे, दिपक माशाळ,जगदीश जाधव यांनी फिर्यादी व फिर्यादीचे इतर नातेवाईकांची पूर्व संमती न घेता व फिर्यादीने बँक मॅनेजर कडे वारंवार तक्रारी अर्ज देऊन रक्कम कोणासही अदा करू नये असे कळविले असताना सुध्दा बँकेचे तत्कालीन मॅनेजर यांनी रक्कम ट्रान्सफर केली असल्याची फिर्याद चंद्रशेखर बागदुरे यांनी वर नमूद आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलिस स्टेशन येथे दाखल केली असून यामध्ये पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते व आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता. यात सरकारपक्षातर्फे युक्तिवाद करताना आरोपीनी बनावट मृत्युपत्र तयार करून त्याद्वारे बँकेतून रक्कम काढलेली आहे,अद्याप संपूर्ण रक्कम हस्तगत करावयाची आहे तसेच आरोपींना जामीनावर मुक्तता केल्यास आरोपी हे फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणतील असा युक्तिवाद केला व मूळ फिर्यादी तर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपींना जामीन देनेस विरोध करणेत आला. Crime  त्यावरून मे.कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यात मुळफिर्यादितर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड. राहुल रुपनर,अँड. वैष्णवी न्हावकर, अँड. शैलेश पोटफोडे,यांनी तर सरकारतर्फे अँड.अमर डोके यांनी तर आरोपीतर्फे अँड. रेवन पाटील,अँड.बाबूशा साळुंखे यांनी काम पाहिले.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update