crime-arrested-in-gambling-case
Crime Solapur City

Crime : माजी आमदारासह 29 जणांना जुगार प्रकरणात अटक, 6 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Crime – कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आलीय. सोलापुरातील होटगी रोडवरील क्लब 9 येथे जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. गुन्हे शाखेतर्फे हा हॉटेलवर धाड टाकली असता या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले. लोकांना जुगार अड्डा स्वतः माजी आमदार रविकांत पाटील चालवत असल्याचा आरोप पोलिसांचा आहे. धाड टाकल्याच्या वेळी माजी आमदार रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते.

महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त

            त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र हॉटेलमध्ये पोलीस गेल्यानंतर जवळपास 19 जण हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख 2 लाख 24 हजार 540 रुपये, 4 लाख 19 हजारांचे मोबाईल, 13 हजारांचे जुगार साहित्य असे एकूण 6 लाख 57 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सर्व 29 आरोपींना रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलीस ठाण्यात बसविण्यात आले होते. रात्री उशीरा सर्व  Crime आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. माजी आमदार रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठण्यासमोर मोठी गर्दी केली होती.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com