fbpx
crime-branch-is-widely-praised

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

सोलापूर Crime  – सोलापूर शहरातील दमाणी नगर परिसरात सोनी सिटी या नावाने सुसज्ज नविन वास्तु प्रकल्प आहे. सदर ठिकाणीचे एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सोलापूर रेल्वे विभागातील इलेक्ट्रीक इंजिनिअर हे दि. ३१/०८/२०२२ पासून त्यांचे कुटुंबासह राहण्यास आहेत.

मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करा

Crime  दिनांक ०१/१०/२०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वा. सुमारास संबंधीत इलेक्ट्रीक इंजिनिअर हे त्यांचे कुटुंबासह फ्लॅटला लॅच-कुलुप लावून बाहेरगावी गेले. ते त्यांचे कुटुंबासह दि.०५/१०/२०२२ रोजी रात्री ०९:३० वा. सुमारास घरी परत आले. त्यावेळी त्यांनी त्यांचे फ्लॅटचे लॅच कुलुप उघडुन आत बेडरूम मध्ये गेल्या नंतर, त्याचे बेडरूम मधील कपाट उघडे दिसले, त्यांना त्या बाबत शंका आल्याने, त्यांनी कपाटाची पाहणी केली असता, त्याचे कपाटातून, २८.०५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ०२ तोळे वजनाचे चांदीचे दागिने, सँगसंग कंपनीचा टॅब अशी एकूण १२,४८,५००/- रुपयाची मालमत्ता चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानी लागलीच नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर येथे याबाबत माहिती दिली. त्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे याबाबत गु.र.नं. ६०५/२०२२ ना.दं.वि. कलम ४५४,४५७, ३८० अन्यये, अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर शहर नियंत्रण कक्ष येथून वरील प्रमाणे घरफोडी चोरीची माहिती मिळलेनंतर घटनास्थळी, डॉ. प्रिती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे व प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, सहा. पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, कर्मचारी दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. Crime घटनास्थळी भेट दिल्यानंतर फिर्यादीचे फ्लॅटचे लेंथ कुलुप तोडले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र, येकाचे स्लायडिंग डोअर उघडे असल्याचे दिसून आले. घटनास्थळाचे निरीक्षण केल्यानंतर, सदरची घरफोडी चौरी ही, डुप्लीकेट चावीचा वापर करून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार, संबंधीत रेल्वे इंजिनिअर यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी फ्लॅटमध्ये राहणेस येण्यापूर्वी त्यांचे नविन फ्लॅट मध्ये फर्निचर, रंगाचे व इलेकट्रिकचे काम करून घेतले होते. सदरचे काम करताना, त्यांनी फर्निचर, रंगाचे व इलैकट्रिकचे काम करणारे कामगारांकडे फ्लॅटच्या चाव्या सोपविल्या असल्याचे निदर्शनास आले. तसेच  फ्लॅटमध्ये साहित्य शिफ्ट करताना संबंधीत रेल्वे इंजिनिअरने त्याचेच कार्यालयातील शासकीय इलेक्ट्रीक वायरमनकडे फ्लॅटची चावी दिली असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार, पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, सपोनि/जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी संबंधीत फ्लॅटमध्ये फर्निचर, रंगाचे व इलेकट्रिकचे काम करणाऱ्या सर्व कामगारांकडे याबाबत चौकशी करण्यात आली. मात्र, त्यापैकी कोणीही त्याठिकाणी चोरी केली नसल्याचे दिसून आले. Crime त्यानंतर, सबंधीत रेलवे इंजिनिअरकडे अधिक चौकशी करता, ते दि.०१/१०/२०२२ ते दि.०५/१०/२०२२ या कालावधीत रजेवर असल्याची माहिती त्यांचे कार्यालयातील कर्मचान्यांना असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर घरफोडी चोरी बाबत रेल्वे कार्यालयातील असे कर्मचारी की ज्यांनी फिर्यादी यांचे घरी भेट दिली होती आणि त्यांचेकडे फिर्यादी यांनी कामानिमीत्त फ्लॅटच्या चाव्या सोपविल्या होत्या, अशा कर्मचान्यांचे हालचालीवर गुन्हे शाखेकडील पोलीसांनी बारकाईने लक्ष ठेवले.

त्यानंतर, सपोनि जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकास, गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, सोनी सिटी, दमाणी नगर, सोलापूर येथील रेल्वे इंजिनिअरच्या घरातील चोरीस गेलेला टॅब विकण्यासाठी म्हणून एक इसम हा सोलापूर शहरातील सिध्देश्वर मंदिर परिसरात येणार आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेकडील सपोनि जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून संशयीत इसमास पकडले असता, त्याचे नाव भाऊराव अर्जुन वाघमाडे रा. १८० आदित्यनगर आर.टी.ओ. ऑफीस जवळ विजापूर रोड, सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले. Crime तसेच तो सोलापूर रेल्वे मध्ये इलेक्ट्रीक वायरमन असल्याचे आणि त्याने फिर्यादी यांचे फ्लॅटला कामानिमित वेळोवेळी भेट दिल्याचे देखील निष्पन्न झाले. त्याचे अंगझडतीत, घरफोडी चोरीतील टॅब मिळून आला. संबंधीत भाऊराव अर्जुन वाघमाडे याचेकडे सखोल तपास करता, त्याने डुप्लीकेट चावीचा वापर करून गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर नमूद आरोपीने गुन्ह्यातील चोरलेली २८.०५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ०२ तोळे वजनाचे चांदीचे दागिने, सॅमसंग कंपनीचा टॅब अशी एकुण १२,४८,५००/- रुपयांची मालमत्ता काढुन दिल्याने ती पोलीसांनी जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कामगीरी मा. डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त , बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रिती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे व सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/जीवन निरगुडे, पोहेकॉ दिलीप भालशंकर, अंकुश भोसले, पोना योगेश बर्डे, वाजीद पटेल, पो.शि संजय साकुखे धायगुडे, प्रकाश गायकवाड व वसीम शेख यांनी केलेली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update