Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Crime – जयंतीला वर्गणीसाठी सोमवार दि ११/०४/२०२२ रोजी सायंकाळी 4:30 वाजता फिर्यादीचे दुकानात बळजबरी केल्याने जोडभावी पेठ पोलीस चौकीत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Crime राजुराम शंकरराम खोत, वय ३० वर्षे, रा. मेडता मार्ग कोतो, का बेरा पादकुला. ता. रियाबडी, जि नागौर राज्य राजस्थान, सध्या सुयोग ४३ सुयोग श्रृष्टी अपार्टमेंट दयानंद कॉलेज, शेळगी रोड, जागृती मंदिर समोर, सोलापूर यांनी फिर्याद दाखल केली आहे. या बाबत माहीती अशी की फिर्यादी व निलेश भुतडा, बिलींग काम करणारा इम्तियाज तांबोळी, मंजु, स्वामी, समीर तांबोळी असे सोलापूर टेक्सटाईल मार्केट दुकानात काम करत असताना चिंटु कांबळे व त्यासोबतचे इतर २ अनोळखी इसम हे दुकानात येवून फिर्यादीस तुझे मालकाला फोन लावून दे असे म्हणाले असता फिर्यादीने फोन लावून दिला नाही तेव्हा त्यांनी फिर्यादीशी वाद घालून दि ०७/०४/२०२२ रोजी दिलेले छत्रपती शाहु महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ न्यु बुधवार पेठ सोलापूर या मंडळाचे २१,०००/- रूपये वर्गणीचे पावतीचे पैसे दया तुम्ही आमचे मंडळाची वर्गणी दिली नाही तर आम्ही तुमचे दुकान चालू देणार नाही तुम्ही यथे कसे काम करता हे बघतो अशी धमकी देवून निघून गेले आहेत. याबाबत चिंटू कांबळे यांचे सोबत असलेले इतर दोघांवर १८४/२०२२ भादंविसक ३८४.३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews