Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Crime – राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 नोव्हेंबर रोजी मंगळवेढ़ा तालुक्यात माचणूर गावाच्या हद्दीत एका ह्यूंडाई आय ट्वेंटी कारमधून गोवा राज्य निर्मित 30 पेट्या विदेशी दारुचा साठा जप्त केला असून कारवाईत वाहनासह पाच लाख 76 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल
Crime सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक संदिप कदम यांना गोवा दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी 25 नोव्हेंबर शुक्रवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास सांगोला-मंगळवेढा रोडवरील माचणुर गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एक ह्यूंडाई आय ट्वेंटी क्रमांक MH02 CL 0811 ही कार येत असल्याचे दिसली, सदर वाहनास जागीच थांबवून पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यात गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारुचा साठा दिसून आला. Crime वाहनचालक लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर, रा. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग या इसमास जागीच ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143