Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) – घरगुती वाद शिगेला जाऊन पत्नी आणि मुलांनी पतीचा खून (Crime) केल्याची घटना बाळापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेलमंडळ येथे आज उघडकीस ( Murder In Hingoli ) आली. धक्कादायक म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नी आणि दोन मुलांनी खून (Crime) केल्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. ( Wife and Two children killes man in Hingoli )
हे वाचा – या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख
शेतकरी असलेले अवधूत लक्ष्मणराव मुधोळ हे कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे पत्नी अन्नपूर्णा आणि लक्ष्मण व ओंकार या दोन मुलांसह राहतात. अवधूत आणि त्यांची पत्नी व मुलांमध्ये काही दिवसांपासून घरगुती कारणातून वाद होते. दरम्यान, अवधूत यांनी परस्पर शेती विकल्याच्या कारणावरून पत्नी आणि मुलांमध्ये खटके उडून वाद विकोपाला गेला. यातूनच बुधवारी रात्री पत्नी आणि दोन्ही मुलांनी मारहाण करून अवधूत यांचा खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह (Crime) शेतात नेऊन जाळून टाकला.
शेतात मृतदेह (Crime) जाळल्याचे शेजारील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे खुनाच्या घटनेला वाचा फुटली. याची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपी पत्नी अन्नपूर्णा मुधोळ, मुलगा लक्ष्मण व ओंकार यांना अटक केली आहे. खून केल्यानंतर तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते अशी माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली.
अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143
#solapurcitynews