fbpx
crime Kidnapped a minor

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापुर/ मंगळवेढा Crime – मंगळवेढा शहरातील एम आय डी सी परिसरातून एका चार वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलिसांत नोेंद झाली आहे. दरम्यान मंगळवेढा पोलिस या घटनेबाबत सतर्क झाले असून सर्वत्र कसून शोध सुरु असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.

                पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील फिर्यादी Crime  मनोजकुमार अमरसिंह साहू (रा.कार्यसरा जि.बेणेतरा राज्य छत्तीसगढ) सध्या ते मंगळवेढा एम.आय.डी.सी. परिसरात वास्तव्यास आहेत. यातील फिर्यादी हे बांधकाम मजूर असून दि.१८ रोजी सायंकाळी ६.०० वा.यातील अपह्त मुलगा रणवीरकुमार साहू हा एम.आय.डी.सी.च्या समोर असताना अज्ञात Crime व्यक्तीने त्याला फुस लावून पळवून नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार शाहरूख पठाण हे करीत आहेत. त्याचे वर्णन रंग-निमगोरा,उंची ३ फुट,चेहरा गोल,नाक सरळ,डोळे मध्यम,अंगात पांढरा टी शर्ट,काळी हाफ पँट,दोन्ही पायात काळा दोरा असून तो हिंदी बोलतो. अशा वर्णनाचा मुलगा कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलिस निरिक्षक रणजित माने 9822227585 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update