fbpx
Crime Made Liquor Transported

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर Crime  – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूरच्या पथकाने गुरुवारी (ता. 12 जानेवारी) बक्षीहिप्परगा (ता. दक्षिण सोलापूर) येथे एका कारमधून वाहतूक होणारी आठशे लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे, तसेच सांगोलाच्या पथकाने नाझरे (ता. सांगोला) व पंढरपूरच्या पथकाने सरपडोह (ता. करमाळा) येथील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून 35 लिटर हातभट्टी दारु व 2 हजार सहाशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायन जप्त केले आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

              Crime  निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी बक्षीहिप्परगा ते मुळेगाव तांडा रोडवर 12 जानेवारी रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास सापळा लावला असता बक्षी हिप्परगा हद्दीत एक चारचाकी वाहन रस्त्यावरुन येताना दिसले. सदर वाहनास अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये दोन इसम व हातभट्टी दारुने भरलेल्या रबरी ट्युब मिळून आल्या. या कारवाईत स्विफ़्ट कार क्र. MH-04-GD-4165 हे वाहन जप्त करुन वाहनातील मोठ्या 8 रबरी ट्युबमध्ये प्रत्येकी 100 लिटरप्रमाणे 800 लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली आहे.

               जप्त हातभट्टीची वाहतूक करणारे आरोपी इसम नामे दिगंबर चंदु राठोड रा. वरळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) व रामचंद्र अंबादास जाधव रा. बक्षी हिप्परगा (ता. दक्षिण सोलापूर) या इसमांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime  या कारवाईत 800 लिटर हातभट्टी दारु व वाहन असा एकूण रु. 3 लाख 40 हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडिकट, गजानन ढब्बे व वाहन चालक रशीद शेख यांनी पार पाडली.  

              तसेच 11 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक सांगोला कैलास छत्रे यांनी सांगोला तालुक्यातील नाझरे गावातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 400 लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केले व नागेश लक्ष्मण जाधव या इसमाच्या ताब्यातून 35 लिटर हातभट्टी दारु जप्त केली. Crime  पंढरपूर विभागाचे निरिक्षक पवन मुळे व दुय्यम निरिक्षक शंकर पाटील यांनी त्यांच्या पथकासह करमाळा तालुक्यातील सरपडोह गावातील हातभट्ट्यांवर धाड टाकून 2 हजार दोनशे पन्नास लिटर रसायन जप्त केले. दोन्ही पथकांच्या कारवाईत एकूण 65 हजार आठशे तीस किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आवाहन
सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून तस्करी होणा-या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. Crime  तसेच रात्रंदिवस सदर पथकाद्वारे पाळत ठेवण्यात येत असून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. Crime  सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update