वर्धा Crime – पैशांसाठी माणूस कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही. व्याजाने घेतलेल्या रक्कमेतील 2 हजार रुपये नंतर देतो म्हणून सांगितले पण शिवीगाळ करत तरुणाला गाडीखाली चिरडून ठार (Crime) मारण्याची खळबळजनक घटना वर्ध्यातील नागसेन नगर परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीला (Crime) अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभू सोनगडे असं मृत तरुणाचे नाव आहे. नागसेननगर येथील मयत शंभू सोनगडे याची पत्नी जयमाला शंभू सोनगडे यांनी 5 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील 3 हजार रुपयांचा परतावा देखील केला होता.
भारतात ओमायक्रोनबाधित आढळलेला पहिला रुग्ण हॉटेलमधून पळाला या रक्कमेतील 2 हजार रुपये परत द्यायचे होते (Crime). त्याकरीता २ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी शैलेश येळणे हा सोनगडे यांच्या घरी गेला. त्यावेळी शैलेश येळणे याने उर्वरित रकमेची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने लवकरच परतावा करेल, असं सांगितलं. त्यावरून येळणे याने सोनगडे यांच्याशी वाद घातला. दरम्यान, उपस्थितांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण वादानंतर शैलेश येळणे घराबाहेर आला आणि गाडीत बसला. बापरे! कारचा दरवाजा उघडताच मालकाला फुटला घाम; नेमकं असं काय होतं आत पाहा दरम्यान, बाहेर गेल्यानंतर शैलेश येळणेने कार सुरू करत बाहेर आलेल्या शंभू सोनगडे यांच्या अंगावर गाडी नेली.
आरोपी शैलेश एवढ्यावरच थांबला नाही कर त्याने त्याच गाडीने शंभू सोनगडे यांना फरफटत नेले. घटना दिसताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत गंभीर जखमी शंभू सोनगडे यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी शैलेश याला अटक केली आहे. अवघ्या दोन हजार रुपयांसाठी घडलेल्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- बाळे परिसरातील तीन, शेळगी परिसरातील 79 व देगाव परिसरातील तीन गट नंबरमधील मिळकत पत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या. या भागातील नागरिकांना सातबारा आणि मिळकत पत्रिका काहीच मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या […]
धुळे शहरातील चौकाचौकात जाऊन पालकमंत्र्यांनी साधला नागरिकांशी संवाद Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा धुळे धुळे जिल्ह्यासह जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. हा विषाणू डोळ्यांनाही दिसत नाही. या विषाणूमुळे जगात आतापर्यंत 8 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना प्राणास मुकावे लागले आहे. धुळे जिल्ह्यातही रुग्ण संख्या […]
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा वसई विरार- पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एका कोरोना सेंटरला आग लागल्याने 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या कोरोना कंट्रोल रूमने याची पुष्टी लेली आहे. इतर रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे. आगीची ही घटना शुक्रवारी पहाटे […]