fbpx
images 23 Crime : वाझे हा खंडणी वसुलीसाठी इतर पोलीस अधिकाऱ्यांना नोकरी घालवण्याची आणि बदलीची धमकी देत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मुंबई Crime-  एका खंडणीच्या गुन्ह्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांच्यासह सचिन वाझेवर (Sachin Waze) आरोपपत्र दाखल झाले आहे. वाझे हा खंडणी वसुलीसाठी  इतर पोलीस अधिकाऱ्यांना नोकरी घालवण्याची आणि बदलीची धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाझे कशा पद्धतीने वसुली करायचा यावरही प्रकाश पाडण्यात आला आहे.

आज बेळगाव बंदची हाक; बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना फासलं काळ

                Crime गोरेगावमध्ये दाखल खंडणीच्या गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्यासह वाझेवर आरोपपत्र दाखल झाले आहे. यात वाझेने कनिष्ठांना वसुलीसाठी नोकरी घालवण्याच्या आणि बदलीच्या धमक्या दिल्याचा उल्लेख आहे. यात काही पोलीस अधिकारी आणि हवालदारांचे जबाबही आहेत. यानुसार, वाझेने परमबीरसिंह यांच्याशी संपर्क साधून शहरातील बार मालक, बुकी आणि इतर अवैध व्यवसायांची माहिती मिळवली होती. आरोपपत्रातील पोलीस अधिकारी आणि हवालदारांच्या जबाबानुसार, वाझेला मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचे संरक्षण होते. गुन्हे शाखेशी निगडित हवालदाराने त्याला बार आणि इतर अवैध धंद्यांची माहिती गोळा करण्यास वाझेने भाग पाडल्याचे म्हटले आहे. वाझे जून 2020 मध्ये पुन्हा रूजू झाला त्यावेळी लॉकडाऊन काळात शहरातील बार आणि इतर बेकायदा व्यवसायांचे तपशील गोळा करण्यास सुरुवात केली होती, असेही त्याने नमूद केले आहे. Crime  हवालदाराने दिलेल्या जबाबानुसार, परमबीरसिंह यांनी दिलेल्या अधिकारांचा वाझेने वापर केला. त्याने बहुतांश हायप्रोफाईल प्रकरणांमधून पैसे उकळले. शहरातील बार आणि रेस्टॉरंट्स डिसेंबर 2020 मध्ये निर्बंधांसह सुरू झाल्यानंतर, वाझेने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. तो काही कॉन्स्टेबल आणि खासगी व्यक्तींचा वापर करून माहिती गोळा करत होता आणि पैसे वसूल करीत होता. तो परमबीरसिंह यांच्या खूप जवळचा होता, अशी चर्चा होती. यामुळे तो पोलिसांना त्याच्यासाठी काम करण्यास जबरदस्तीने भाग पाडत असे. या प्रकरणात परमबीरसिंह यांच्यासोबत सचिन वाझे आणि आणखी चार आरोपी आहेत. त्यातील सुमितसिंह ऊर्फ चिंटू आणि अल्पेश पटेल यांना अटक करण्यात आली आहे. रियाज भाटी आणि विनयसिंह ऊर्फ बबलू हे फरार आहेत. याच प्रकरणात परमबीरसिंह यांना फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. मागील आठवड्यात हा आदेश रद्द करण्यात आला होता. सिंह यांच्या विरोधात Crime आणखी चार प्रकरणात आरोपपत्र दाखल व्हायचे आहे. त्यांच्या विरोधातील हे पहिले आरोपपत्र आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update