Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
महावितरण औद्योगिक शाखा कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी
Crime दि. १६/०४/२०२२ रोजी दुपारी पावणे दोन पर्यंत आसरा चौक, बंथनाळ मठ जुळे सोलापूर, जुना विजापूर नाका झोपडपट्टी नं. ०२, सोरेगांव बस स्टॉपजवळ, गैबीपिर झोपडपट्टी आसरा चौक जवळ सोलापूर या ठिकाणी इसम नामे १) इरफान बाबुलाल फनीबंद वय – ४२ वर्षे, २) संतोष लहु इरकशेट्टी वय ४२ वर्षे, (३) सिताराम देविदास सुतार वय ४५ वर्षे, ४) दत्तात्रय शरणप्पा म्हेत्रे वय ४० वर्षे, ५) शहानवाज मो. हनिफ शेख वय-३८ वर्षे, यांनी सार्वजनिक रस्त्यामध्ये जागेवर इसम नामे आप्पु चौगुले, प्रशांत लोंढे, निखील भोसले, मेठे पुर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्या सांगण्यावरुन व दिलेल्या चिथावणीवरुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडुन पैसे घेऊन येणारे अंदाजे अंक आकडयांवर पैशांची पैज लावुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळुन आले असता ०५ एजंट यांना त्यांच्याकडे मिळालेल्या रोख रक्कम २७,२९५/- रुपये व जुगार साहीत्य असे मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर बाबत विजापूर नाका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) सह भा.दं.वि. सं. कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. तसेच पाहीजे आरोपी नामे आप्पु चौगुले, प्रशांत लोंढे, निखील भोसले, मेठे यांचा शोध सुरु आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त हरीष बैजल, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ जीवन निरगुडे, पोह/५० दिलीप भालशंकर पोना / ४५० योगेश बर्डे, पोना/६६८ वाजीद पटेल, पोकॉ/१५४२ संजय साळुंखे, चालक पोकॉ/१००८ नरेंद्र नक्का यांनी केली.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews