Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Crime – याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणारे धोत्रे हे गाव या गावातील आठ वर्ष चिमुकला पृथ्वीराज सुरेश बिराजदार याला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता फूस लावून पळवून नेल्या बाबत दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, अक्कलकोट विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर, सोलापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सोलापूर, सातारा, सांगली, पुणे,तसेच कर्नाटक राज्यात कन्नड भाषेमध्ये सदरची बातमी प्रसारित केली होती, त्याच प्रमाणे विविध सोशल मीडियाद्वारे बालकाचा शोध होण्यासाठी फोटो व्हायरल केलं होत. तसेच वळसंग पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी अंमलदार यांचे पाच तपास पथके तयार करण्यात आले होते.
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Crime एकूण पाच तपास पथके तयार करून वेगवान तपास सुरू होते. दरम्यान एका गुप्त बातमी दारांकडून पोलिसांना बातमी मिळाली की, यातील पीडित मुलगा कुडल सांगली येथे एका आरोपीच्या घरात आहे अशी माहिती मिळाली त्यामुळे लगेच पोलिसांनी कुडल सांगली पलूस सांगली व हलूर बेळगाव या ठिकाणावरून शोध घेऊन सदर आरोपी व मुलगा हे मिळून आले सदरच्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे यामध्ये. 1) नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ रा. बाबानगर ता. तिकोटा जि. विजापूर सध्या राहणार रामानंद नगर नलावडे मळा पलूस जिल्हा सांगली 2) लक्ष्मण किसन चव्हाण वय 27 रा. लहू तालुका माढा जिल्हा सोलापूर 3) केदार बाळासाहेब शिवपुजे वय 20 राहणार कंडल हायस्कूल रोड ता. पलूस जि. सांगली 4) संतोष धोंडप्पा शेडशाळ वय 27 रा. किर्लोस्करवाडी, पलूस जिल्हा सांगली 5) रमेश भीमगोंडा बिरादार वय 38 रा. हल्लुर तालुका मडोलगी जिल्हा बेळगाव… असे आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपींनी पाच लाख रुपये खंडणी उकळण्याचा उद्देशाने सदर बालकाचे अपहरण अर्थात किटण्याप केले असल्याची कबुली दिली आहे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रभारी अधिकारी अतुल भोसले व तपास पथकांनी केलेल्या तपासाचे खूप कौतुक केले तसेच धोत्री ग्रामस्थांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सत्कार करून जंगी स्वागत केले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews