Crime: Tehsildar arrested
Maharashtra

Crime : 25 हजाराची लाच घेताना तहसीलदारास रंगेहाथ अटक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

चंद्रपूर Crime –  चंद्रपूर जिल्ह्यात लाच स्वीकारताना तहसीलदारास रंगेहाथ अटक करण्यात आली. डॉ. निलेश खटके असे अटक केलेल्या तहसीलदार यांचे नाव असून चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. वीटाभट्टीसाठी लागणारी लाल माती उत्खननची परवानगी साठी 25 हजारांची लाच मागितली होती. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

         Crime भद्रावती येथिल अर्जदाराची विटाभट्टी आहे.विटाभट्टीसाठी लाल माती गरजेची होती.लाल मातीचा उत्खननासाठी अर्जदाराने रितसर परवानगी मिळण्यासाठी तहसिल कार्यालयात अर्ज Crime दाखल केला.मात्र तहसिलदार डॉ.निलेशा खटके यांनी परवानगी हवी असेल तर 25 हजार रूपये द्यावे लागतील अशी अट ठेवली.मात्र अर्जदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती.त्याने थेट चंद्रपूर येथिल लाचलुचपत विभागाचे कार्यालय गाठले. लाचलुचपत विभागाने सापळा रचून भद्रावती तहसिल कार्यालयात छापा टाकला. Crime यावेळी तहसिलदार डॉ. निलेश खटके यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले.या कार्यवाहीने चंद्रपूर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews