fbpx
IMG 20220413 WA0014 Crime : विजापूर वेसेत छापा टाकुन तंबाखुजन्य पदार्थ, ओला मावा, सुका मावा असे 50,550 हजाराचा मुद्देमाल जप्त

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Crime- पोलीस आयुक्त साो. सोलापूर शहर यांच्या विशेष पोलीस पथकाने बाशाभाई पानशॉप मा. पोलीस आयुक्त साो. सोलापूर शहर यांच्या विशेष पोलीस पथकाने बाशाभाई पानशॉप विजापूर वेस सोलापूर येथे छापा टाकुन ०१ आरोपी व तंबाखुजन्य पदार्थ, ओला मावा, सुका मावा, रजनिगंधा डब्बे, पुडया एकुण किंमत ५०,५५०/- रुपयांचा साठा जप्त करण्यात आले. असे दि. १३/०४/२०२२ रोजी विशेष पोलीस पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फतीने विजापूर वेस येथील बाशाभाई पानशॉप सोलापूर येथे प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ, रजनिगंधा, सुपारी मावा विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

दमदाटी करत जयंतीला वर्गणी मागितल्याने जोडभावी पेठ पोलिसात 3 जणांवर गुन्हा दाखल

सदर विजापूर वेस येथील बाशाभाई पानशॉप सोलापूर येथे आलो असता त्याठिकाणी एक इसम पानशॉप मध्ये बसलेला दिसला त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोहमद जुबेर अ. बाशा जहागीरदार वय-३६ वर्षे, व्यवसाय पानशॉप, राहणार घ.नं. २४९ शनिवार पेठ सोलापूर असे असल्याचे – सांगितले. सदर बाशाभाई पानशॉपची पाहणी करावयाची आहे असे सांगुन सदर पानशॉपमध्ये जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ, सुपारी, मावा, रजनिगंधा आले आहेत. सदर तंबाखुजन्य पदार्थ, मावा, रजनीगंधा हे मनाई आदेश असताना बेकायदेशिर पानशॉपमध्ये साठाकरुन ठेवलेल्या आवस्थेत तंबाखुजन्य पदार्थ, ओला मावा, सुका मावा, रजनिगंधा डब्बे, पुडया असे एकुण किंमत ५०,५५०/- रुपयांचा माल हा मिळुन आल्याने सदर ठिकाणी मा. अन्न पुरवठा निरीक्षक यांना बोलावून घेऊन सदर ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर बाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे भादविक १८८, २७२, २७३ व ३२८ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२)(i), २६ (२)(ii), २६(२)(iv), २७ (३)(E), ३० (२) (A) नियमन ३.१.७ सहवचन नियम २.३.४ तसेच ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कामगिरी मा. श्री. हरीष बैजल साहेब, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली ● सपोनि / जीवन निरगुडे, पोह/५० दिलीप भालशंकर, पोना / ४५० योगेश बर्डे, पोना/६६८ वाजीद पटेल, पोकॉ/१५४२ संजय साळुंखे, चालक पोकॉ/१००८ नरेंद्र नक्का यांनी केलेली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update