Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Crime–१८ फेब्रुवारी रात्री 10 च्या सुमारास, भवानी पेठ, घोंगडे वस्ती मधील जय भवानी प्रशालेतील मैदानात विना परवाना व गर्दी जमवून शिवजयंती केल्याबद्दल शकील मुस्तफा शेख, नेम जोडभावी पेठ पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांनी जोडभावी पेठ पोलीस चौकीत गुन्हा नोंदविला आहे.
Crime ७७/२०२२ भादंविसंक १४३, १८८,२६९,३३६, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब) अंतर्गत १) अय्याज कादर शेख, २) आसिफ महमद शेख, ३) गौस कादर शेख, ४) तमजित चांद गोगी, ५) अकिल चांद पठाण, ६) शहाबुद्दीन रजाक कोरबु, सर्व रा. घोंगडे वस्ती, सोलापूर यातील वरील आरोपींनी शहिद टिपु सुल्तान ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष अयाज शेख (मन्या भाय) आणि कार्याध्यक्ष आसिफ महमंद शेख असा डिजीटल बॅनर लावुन स्टेज व खुर्च्या टाकुन गर्दी जमवुन लोकांना लेजर शो दाखवित असताना मिळुन आले. तसेच आरोपीत क्रं. ६ हा बॉस असे नाव लिहिलेले साऊंड बॉक्स हे गर्दीचा फायदा घेवून निघुन गेला आहे. तरी वरील आरोपीतांनी मा. सोमपा यांनी पारीत केलल्या आदेशाचे उल्लंघन करुन गैरकायदयाची मंडळी जमवुन मानवी जिवीतास सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याची हयगयीची कृती केली आहे म्हणून कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधी पुढील तपास पोना कांबळे करत आहेत.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
****अधिक माहितीसाठी संपर्क ***
सुनिल कोडगी, संपादक
9503221143 / 9404151143