Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
कर्नाटक राज्यातून सोलापूर शहर जिल्हात येण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक
10 वी 12 वी वगळता सर्व शाळा महाविद्यालये बंद
सोलापूर – सोलापूर शहर जिल्ह्यात आजपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला आहे.24 फेब्रुवारी पासून रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत संचारबंदी ची घोषणा करण्यात आली आहे.7मार्च पर्यंत ही संचारबंदी असून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केलाय.
पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली या ok 9 त्यांनी 24 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे.10 आणि 12 वी वगळता शाळा महाविद्यालये बंद राहणार आहेत.तसेच कर्नाटक राज्यातून सोलापूर शहर जिल्हात दाखल होण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.तशी घोषणा देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143