customer returned the forgotten
Solapur City

दुकानात ग्राहकांनी विसरून गेलेला ३३ हजाराचा फोन बोलून केला परत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सुरेंद्र शेठीया यांचा असा ही प्रमाणिकपणा
सोलापूर (प्रविणकुमार बाबर)- धावपळीच्या जीवनात आजही असे काही प्रामाणिक, जिवलग माणस आहेत याची आज वर्तमानकाळात प्रचिती पाहायला मिळाली, सकाळची वेळ दुकान उघडणे पुसणे, झटकने, चालु होते त्यांतच मी सोलापूरातील सुप्रसिद्ध तुलसी जनरल सप्लायर्स मध्ये गेलो आणि शेतीविषयक सामानाची चौकशी केली व घेण्यासाठी त्यांना मी मोबाईल काही इलेक्ट्रिक साहित्याचे फोटो मोबाईल मध्ये काढून आणले होते, त्यांना दाखवली व त्यांतच माझा मोबाईल मी तिथेच ठेवला व गडबडीत सामानाची कशी बशी खरेदी करून गावाकडे जाण्याच्या दिशेने निघालो तिथून २ तासांनी मी फोन करावा या उद्देशाने खिशाला हात लावला पण कोणत्याच खिशात मोबाईल हातात लागेना जीवाची लाही लाही झाली आता…मोबाईल कुठंतरी पडला…!

हे वाचा– ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमाला सर्व यंत्रणांचे सहकार्य आवश्यक

आता काय अवघड आहे. त्यातूनच मी दुसऱ्याचा मोबाईल घेऊन मी माझ्या मोबाईल ला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण फोन व्यस्त दाखवत होता. थोडया वेळाने मी विचार केला आपण कुठे कुठे गेलो होतो. तुलसी जनरल सप्लायर्स येथे शेती पंपाचे समान खरेदी करण्यासाठी गेले असता त्या दुकानात गर्दी मोठ्या प्रमाणात होती, आणि मी सामानाची खरेदी करून गाडीत बसलो आणि तिथून निघून गेलो, जवळपास दोन तासानी त्यांच्या लक्षात आले की, माझा मोबाईल…..! मोबाईल मोबाईल म्हणत इकडे तिकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल चा काय पत्ता लागेलना त्वरित त्या हरविलेल्या मोबाईलला मी माझ्या भावजींच्या नंबर वरून फोन केला , तेव्हा फोन तुलसी जनरल सप्लायर्स चे मालक सुरेंद्र शेठिया जी यांनी उचलला आणि सांगितले तुम्ही घाबरू नका …तुम्ही सामान घेत असताना तुमचा मोबाईल इथेच कॉन्टरवर राहिलेला माझ्या नजरेस आला आणि तो मी माझ्या लॉकर मध्ये सुरक्षित ठेवला आहे. म्हंटल्यावर मी तेव्हा सुटकेचा निस्वास् सोडला. माझा मोबाईल किती किमतीचा होता हे महत्त्वाचे नव्हते पण त्यातील स्टोरेज डाटा , नंबर्स अशा अन्य बाबी महत्वाच्या होत्या, पण या धावपळीच्या जीवनात सुरेंद्र शेठिया जी सारख्या प्रामाणिक आणि निस्वार्थी माणस या जागात मिळणं कठीणच आहे. सुरेंद्र शेठियाजी आपल्या प्रामाणिक पणाचा आदर्श आपण आपल्या कार्यातून दाखवल्याबद्दल पत्रकार प्रविणकुमार बाबर यांनी आभार मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143