Religious Solapur City

सोलापूरच्या वारकरी संप्रदायाची कन्या देशात नाव लौकिक करावे- सुरेश पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- संत तुकाराम महाराज मंदिरात पूर्व विभाग वारकरी मंडळाच्या वतीने आशीर्वाद रुपी सत्कार व सेवानिवृत्ती चे कार्यक्रम संपन्न झाले. छत्रपती शिवाजी प्रशालेच्या शिक्षक पदावरून छाया खंडाळकर सेवानिवृत्ती झाल्यानिमित्त व वारकरी संप्रदायचे ह.भ.प. विजयकुमार गाडे यांची कन्या उच्याशिक्षणासाठी कु. मृणाली गाडे या रशियात पुढील शिक्षणासाठी परदेश दौरा निमित्त जाणार आहे यानिमित्त आज शनिवारी सकाळी ह. भ. प विष्णू महाराज यांच्या हस्ते गेंट्याल चौकातील संत तुकाराम महाराज मंदिरात सत्कार करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर शहर मध्यचे आमदार प्रणिती (ताई) शिंदे सह नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेविका अंबिका पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प. विष्णू केंद्र महाराज यांनी आई बद्दल माहिती दिले. वै. ह.भ.प गोविंद केंद्र महाराज यांचे वारसदार व संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिराचे मठाधिपतींनी आपल्या प्रवचनातून सर्वांना आशीर्वाद दिले. याप्रसंगी राजकुमार पाटील, लिंगराज पाटील, उषा पाटील, ह.भ.प. विष्णू महाराज मोरे, ह.भ.प राजू मोरे, भगवंत मोरे, प्रभाकर, हरिदास बाबुराव खंडाळकर, शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जुजगार मॅडम, सोमनाथ ताकमोगे, तानाजी सलगर आदींची उपस्थित होती.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143