fbpx
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

औरंगाबाद- शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने  जमीन, पाणी संवर्धन गरजेचे असून त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.  वाल्मी संस्थेच्या प्रशिक्षणातून हे उद्दिष्ट साध्य करत राज्यात जलसंवर्धनाची नवी पहाट व्हावी, असे प्रतिपादन मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे ‘मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि आमची माणसे’ या दोन दिवसीय बुद्धिमंथन कार्यशाळेचे उद्घाटन  गडाख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह आ. रमेश बोरनारे, मृद व जलसंधारण व मग्रारोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, मनरेगा आयुक्त शंतनु गोयल, मृद व जलसंधारण आयुक्त तथा वाल्मीचे प्रभारी महासंचालक मधुकर आर्दड, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

                                 यावेळी जलसंधारणमंत्री गडाख म्हणाले, राज्याच्या शाश्वत विकासासाठी उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा सुयोग्य वापर आणि त्यासाठीचे प्रशिक्षण ही काळाची गरज असून याव्दारे आपण राज्याचा, कृषी क्षेत्राचा आणि पर्यायाने शेतकऱ्यांचा विकास साध्य करू शकतो.  या प्रशिक्षणामध्ये वाल्मी संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण जमीन आणि पाणी या नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. उपलब्ध जमीन, पाणी या घटकांचा सुनियोजित उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणे गरजेचे असून त्यादृष्टीने वाल्मी संस्थेला अधिक बळकट करण्यासाठी कृती आराखडा जलसंधारण विभागातर्फे तयार करण्यात आलेला आहे, असे सांगून गडाख यांनी पाण्याचा योग्य व गरजेपुरताच वापर करण्याचे बंधन आपण प्रत्येकाने पाळले पाहिजे, तरच उपलब्ध पाणीसाठा आपल्याला आवश्यक प्रमाणात मिळेल. यासाठी पाणी नियोजनाचे महत्त्व आणि पद्धती सांगणारे प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या गेल्या पाहिजे. यादृष्टीने वाल्मी संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम राबवल्या जावेत. त्यासाठीचे परिपूर्ण नियोजन तयार ठेवावे. जेणेकरून अशा कार्यशाळांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात समाजापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती व उपाययोजना पोहचविता येतील. तसेच प्रशिक्षितपणे शेती, पूरक उद्योग करणे, पाणी व जमिनीचे संवर्धन करणे या उद्दिष्टांची पूर्तता अधिक गतीने करणे शक्य होईल. जनसहभागातून अशा पद्धतीने जमीन आणि पाणी संवर्धनाची काम अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने अशा प्रशिक्षण कार्यशाळा निश्चितच उपयुक्त व दिशादर्शक आहेत, असे सांगून गडाख यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सुखी झाला पाहिजे, या उद्देशाने मृद व जलसंधारण विभाग आणि रोहयो, फलोत्पादन विभाग यांनी एकत्रित प्रयत्नातून काम करण्याची गरज असल्याचे गडाख यावेळी म्हणाले.

यावेळी रोहयो मंत्री भुमरे यांनी राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, विहिरी, शेततळे, रेशीम लागवडसह अनेक उपयुक्त कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे सांगून मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सक्षम, समृद्ध करण्यासाठी रोजगार निर्मितीवर प्राधान्याने भर देण्यात येत असून रोहयोची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये मृद व जलसंधारण विभाग आणि फलोत्पादन, रोहयो या विभागांनी एकत्रितपणे ग्रामीण जनतेच्या सक्षमीकरणासाठी, कृषी आणि शेतकरी यांच्या बळकटीकरणासाठी काम केल्यास निश्चितच राज्याच्या ग्रामीण विकासाला गती प्राप्त होईल. त्यादृष्टीने मनरेगाची जोड देऊन शेती विषयक, मृद व जलसंधारणाची अधिकाधिक कामे करण्यावर भर देण्यात येईल. शेती, शेतकरी यांच्यासाठी ते  सहाय्याचे ठरेल. तसेच अल्पभूधारक, भूमिहीन शेतकरी वर्गासाठी शासन विविध योजना राबवत असून प्रत्येक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, यासाठी प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी आणि शेतकरी सहभाग महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने अशा प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त असून जलसंधारण कामाला गती देण्यासाठी तसेच वाल्मी संस्थेला बळकट करण्यासाठी रोहयो विभाग सहाय्य करेल, असेही भुमरे यांनी यावेळी सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक नंदकुमार यांनी केले. आर्दड यांनी वाल्मी संस्थेबाबत माहिती दिली. तर प्रा. पुराणिक यांनी आभार मानले. या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध मान्यवर मग्रारोहयोची भूमिका, आदर्श गाव संकल्पना, शासन निर्णय, विविध अधिकारी अनुभव, पाणी फाऊंडेशनचे काम मृद व जलसंधारण, स्वयंसेवी संस्थांची भूमिका यासह इतर विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update