Solapur city news
Electricity

म्हणून वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्यास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून आता अंतिम मुदत दि. 31 मे 2021 ही आहे. तसेच 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना ऑफलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे वीजदर सवलत मिळण्यासाठी यंत्रमागधारकांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्तालयाने केले आहे.

              वस्त्रोद्योग आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, राज्य शासनाच्या राज्य वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 मे 2021 पर्यंत आहे. तसेच 25 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयानुसार, 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन यापैकी कुठल्याही प्रकारे अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज करणाऱ्या यंत्रमागधारकांनी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील अर्ज डाऊनलोड करून वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य, सिव्हिल लाईन्स, नागपूर या ठिकाणी पाठवावेत, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com